गोपीनाथ गडावर हजारोंच्या संख्येत लोकांची उपस्थिती
गोपीनाथगड (रिपोर्टर) आपल्या उभ्या राजकीय जीवनात धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची पताका फडकवणारे संघर्ष योद्धा स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गोपीनाथ गडावर नतमस्तक होण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. दुपारी एक वाजता ह.भ.प. ढोक महाराज यांचे कीर्तन सुरू होते. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळीच स्व. मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले.
स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे आज आठवे पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने गोपीनाथ गडावर सामाजिक, अध्यात्मिक कार्यक्रमांची प्रचंड रेलचेल असून आज सकाळपासून जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार मुंडे समर्थकांनी गोपीनाथ गडावर जावून स्व. मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. स्व. मुंडेंच्या ज्येष्ठ कन्या तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनीही मुंडेंच्या समाधीशी नतमस्तक झाल्या. दुपारी ह.भ.प. ढोक महाराज यांचे कीर्तन सुरू असून ओबीसींसाठी झगडणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांची गोपीनाथ गडावर प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे अनुयायी गोपीनाथ गडावर डेरेदाखल झाले आहेत.