बीड (रिपोर्टर) येथील जिल्हा आणि महिला बालकल्याण शासकीय समितीच्या अध्यक्षपदी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांची राज्य सरकारने केली आहे.
शासकीय महिला बालकल्याण समितीची मुदत संपल्याने राज्य सरकारने या समितीची पुनर्रचना केली असून बीड जिल्हयातील तीन सदस्य आणि एक अध्यक्ष ही समिती कार्य करते. अध्यक्षपदी जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लक्ष्मण तांगडे यांची अध्यक्षपदी निवड केल्यानंतर सदस्यपदी शीतल दांगट, प्रा. छाया गळगे, संतोष वारे आणि सुरेश राजहंस यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. या सर्वांचा कालावधी 2 जूनपासून पुढील तीन वर्ष राहणार आहे.