अंबाजोगाई (रिपोर्टर) शहरातील स्वाराती हॉस्पिटल परिसरात आज सकाळी एक नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका कुत्र्याने त्या अर्भकाचे लचके तोडले आहेत.
स्वाराती रुग्णालय परिसरातील चनई रोडवर मुलांच्या वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये एका पिशवीत स्त्री जातीचे अर्भक होते. त्याचे लचके कुत्रे तोडत असताना तेथे मुख्य सुरक्षा अधिकारी बी.डी. शिकाळेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती स्वाराती रुग्णालय आणि अंबाजोगाई शहर पोलिसांना दिली. त्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख बाळासाहेब पवार यांनी आपल्या पथकाला पाठवून अर्भक ताब्यात घेतले. त्या अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडले आहे. पोलीस आणि स्वाराती रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर आज सकाळी प्रसुत झालेल्या महिलांची आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. मुलगा हवा म्हणून हे स्त्री जातीचे अर्भक फेकून दिले आहे की अन्य काही प्रकार आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दुपारपर्यंत पोलिसांच्या हाती काहीच सापडले नाही.