बीड (रिपोर्टर) सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत एकत्रीत येवून काम करा. भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर आणा. लोकांच्या अडीअडचणी समजून घ्या. त्या सोडवण्यासाठी मदत करा. असे म्हणत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक घेत औरंगाबादमध्ये होणारी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा न भूतो न भविष्य होणार असून ही सभा अधिक अधिक मोठी होईल यासाठी सर्वानी कामाला लागा असे आदेश यावेळी जाधवांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांना दिले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जाहिर सभा होत आहे. त्या सभेच्या अनुषंगाने आज ीडमध्ये संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पा जाधव, दिलीप गोरे, कुंडलिक खांडे, बाळासाहे अंबुरे, परमेश्वर सातपुते,सचीन मुळुक, विलास बडगे, अरुण डाके, बप्पासाहेब घुगे, फारुक पटेल, संगीता चव्हाण, सागर बहिर, जयसिंग चुंगडे यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आनंद जाधव म्हणाले की, सध्याचे राजकीय आव्हान स्विकारत भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर आणा, लोकांना वस्तुस्थिती सांगा, लोकांच्या अडीअडचणी समजून सांगा, त्या सोडवण्यासाठी मदत करा, बाळासाहेबांचा शिवसैनिक 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणार आहे. 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जी सभा होणार आहे ती सभा न भूतो न भविष्य होईल यात शंका नाही. मात्र हि सभा आणखी अभूतपूर्व व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत कामाला लागण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.