भोजलिंग काका यांच्या विरोधात अनोद्गार काढल्याने संतापबीड (रिपोर्टर)- ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी विश्वकर्मा समाजाचे संत भोजलिंग काका यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने याचा सर्वस्तरातून निषेध होऊ लागला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वकर्मा पांचाळ, सुतार समाजाच्या वतीने पाटील महाराज यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
वारकरी संप्रदायाचे आद्य संत व विश्वकर्मा समाजाचे संत भोजलिंग काका हे परभणी जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेतील आद्य संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज व संत मुक्ताई यांच्या चारही भावंडांचा समाजाने बहिष्कृत केल्यानंतर त्यांचा सांभाळ केला व त्यांचे पालन-पोषण केले. एवढे मोलाचे कार्य असणार्या भोजलिंग काका यांच्या बाबतीत स्वयंघोषीत ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी अनुद्गार काढून सुतार समाजाच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ आज समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विठ्ठल पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.