Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही केंद्र सरकारकडून परवड

कोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही केंद्र सरकारकडून परवड


कोरोना युद्धात शहीद झालेल्यांच्या अनेक कुटुंबियांना
विम्याचा लाभ नाही केवळ २७ कुटुंबियांना मिळाला लाभ
मुंबई (रिपोर्टर):- कोरोनामध्ये काम करणार्‍या कोरोना योद्धांना ५० लाखांचे विमा कवच लावण्यात आले मात्र यातही केंद्र सरकार कंजुसपणा करत असल्याचे दिसू नयेत आहे. केवळ २७ टक्के कुटुंबांनाच ५० लाखाच्या विमा योजनेचा लाभ मिळाला असल्याचे समोर आले. या प्रकरणी संबंधित मयत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियात संताप व्यक्त केला जात आहे. सदरील ही योजना ३० मार्च २०२० रोजी सुरू करण्यात आली होती.
माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल २०२१ पर्यंत महाराष्ट्र सरकारने एकूण दोनशे दहा अर्ज या योजनेखाली केंद्र सरकारला पाठवले. परंतु त्यातील फक्त ५८ अर्जदारांना विम्याचे पन्नास लाख रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. याचा अर्थ एकूण फक्त २७ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांच्या कुटुंबांना याचा लाभ झाला आहे.
जिल्ह्यांतील आकडेवारी पाहिली तर पुणे जिल्ह्याने सगळ्यात जास्त म्हणजे ४७ अर्ज तर मुंबईतील महानगरपालिका बीएमसी यांनी ३८ अर्ज केंद्र सरकारला पाठवले आहे. आश्चर्य म्हणजे मुंबईत सगळ्यात जास्ती मृत्यूचा आकडा असून त्यानुसार अर्ज फारच कमी गेल्याचे दिसते. परंतु या अर्जांपैकी केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यातील फक्त तीनच अर्ज मान्य केले तर मुंबईतील बावीस अर्ज मान्य करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील एकूण १९ डॉक्टरांचे अर्ज पाठवण्यात आले परंतु फक्त दहाच डॉक्टरांचे अर्ज मान्य करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील फक्त एकच डॉक्टरचा अर्ज पाठवण्यात आला आहे आणि तोही मान्य झालेला नाही. खचA अनुसार, महाराष्ट्रात ७८ डॉक्टर्स मरण पावले आहेत. याचा अर्थ फक्तं काहीच डॉक्टरांना विम्याचा लाभ मिळाला आहे. पूर्ण महाराष्ट्रात नऊ पैकी फक्त तीन नर्सेस यांना तर सहा पैकी तीन आशा कार्यकर्त्यांना विम्याची रक्कम मिळालेली आहेत.

Most Popular

error: Content is protected !!