मुंबई (रिपोर्टर): निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्य आणि बाण हे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडे गेल्यानंतर ठाकरेंच्या जवळ केवळ आता भाता शिल्लक राहिला आहे. त्या भात्यातले बाण आणि हातातले धनुष्य आपलेच आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला आहे असे म्हणत न्याय मागण्यासाठी ठाकरे गट सुप्रिम कोर्टाच्या दारात गेले खरे मात्र सुप्रिम कोर्टाने याचिका दाखल करून न घेता ठाकरे गटाला उद्या कोर्टात या असे सांगितल्याने आज तरी ठाकरेंचा भाता रिकामा आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाचा निकाल हा चुकीचा असल्याचे काही कायदेतज्ञांचे मत आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. मात्र सुप्रीम कोर्टानं आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टासमोर मांडायचा प्रयत्न केला. त्यावर कोर्टाने त्यांना उद्या मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्वव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायालयाचा निर्णय येण्याआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला!
विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की, आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला उद्धन ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.