Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाराक्षसभुवन येथील गोदापात्रातून 100 ब्रास वाळू साठा जप्त तहसीलदार सचिन खाडे यांची...

राक्षसभुवन येथील गोदापात्रातून 100 ब्रास वाळू साठा जप्त तहसीलदार सचिन खाडे यांची कारवाई


गेवराई :(रिपोर्टर) तालुक्यातील राक्षसभुवन येथे गोदावरी नदीपात्रा शेजारी अवैध रित्या उपसा करून ठेवलेला 100 ब्रासचा साठा सोमवार रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास गेवराई तहसीलदार व अंबड तहसीलदार यांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. या कारवाई मुळे अवैध रित्या वाळु उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. तर जप्त केलेला वाळुसाठा गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली.
तालुक्यातील राक्षसभुवन येथे अवैध रित्या वाळुचा साठा केल्याची माहिती गुप्त खब-या मार्फत मिळाल्यावरून येथील तहसीलदार सचिन खाडे व अंबड जिल्हा जालना चे तहसीलदार जे.डी.कर्नाळ यांच्या संयुक्त पथकाने सोमवार रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास राक्षसभुवन येथील गोदावरी नदी पात्रा जवळ काही वाळु माफियने अवैध रित्या उपसा करून ठेवलेला 100 ब्रास वाळुचा साठ जप्त करून हि जप्त केलेली वाळु गेवराई येथील शासकीय विश्रामगृहात येथे आणण्यात येत असुन साठा करणा-यांची माहिती घेवुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. या कारवाई गेवराई तहसीलदार याच्या पथकातील तलाठी,मंडळ अधिकारी तसेच अंबड येथील तहसीलदार याच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.या कारवाई मुळे अवैध वाळु उपसा करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!