Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडसंपादक जालिंदर धांडे यांना मातृशोक

संपादक जालिंदर धांडे यांना मातृशोक


बीड (रिपोर्टर):- सायं. दैनिक प्रारंभचे संपादक जालिंदर धांडे यांच्या मातोश्री आयोध्या ज्ञानदेव धांडे यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 52 वर्षे होते. त्यांच्या पार्थीवदेहावर बीड येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयेध्या ज्ञानदेव धांडे ह्या गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजारामुळे बीड येथील रुग्णालयात उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान सोमवार दि.17 मे रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. त्या मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. धांडे परिवाराच्या दुखा:त दैनिक रिपोर्टर परिवार सहभागी आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!