राधिका ज्वेलर्सने ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन केला
– ऍड. सानप
बीड (रिपोर्टर) राधिका ज्वेलर्सची भाग्यवान विजेता ग्राहक सोडत दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी मुक्ता लॉन्स, बीड येथे संपन्न झाली असून या सोडतीत डॉ. मदन वरकड रा. केसापुरी (परभणी) (कुपन क्र. 1873), कु. राजनंदिनी राहुल शिंदे रा. मांजरसुंबा (कुपन क्र. 1734) , श्री. अशोक शिंदे रा. अंथरवण पिंप्री (कुपन क्र. 1844)
हे तीन ग्राहक भाग्यवान विजेते ठरले आहेत. भाग्यवान विजेता ठरलेल्या तीनही ग्राहकांना राधिका ज्वेलर्स कडून सुझुकी क्सेस या गाड्या बक्षीस देण्यात येणार आहेत. राधिका ज्वेलर्सच्या भाग्यवान विजेता ग्राहक सोडत कार्यक्रम प्रसंगी जणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.. विवेकानंद सानप, दैनिक रिपोर्टर चे संपादक शेख तय्यबभाई ,
महानंदचे संचालक विलास बापू बडगे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गुळभिले , तहसीलदार मंदे साहेब, टॅक्स कन्सल्टंट देशमुख साहेब, अविष्कार क्लासेसचे संचालक प्रा.सुनील खंडागळे, नगरसेवक संजय उडान, पोलीस कॉ. दत्तात्रय दुधाळ, उद्योजक भरत झांबरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 200 ते 250 ग्राहक , आप्तेष्ट, मित्रपरिवार व जाणीव प्रतिष्ठान चे सभासद या सर्वांच्या प्रचंड उपस्थितीत अत्यंत पारदर्शक पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात भाग्यवान विजेते ग्राहकांची निवड प्रक्रिया पार पडली.
राधिका ज्वेलर्सच्या माध्यमातून अविनाश काळे यांनी मागील 25 वर्षांपासून बीड शहरात ग्राहकांचा प्रचंड विश्वास संपादन केला असून सोन्याची शुद्धता, पारदर्शक व सचोटी पूर्ण व्यवहार तसेच प्रामाणिकपणाच्या जोरावर मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला असून त्यांनी 2015 पासून नव्या रुपात हॉलमार्क सुवर्णालंकाराचे बीड जिल्ह्यातील पहिले दालन म्हणून नावलौकिक मिळवला आहे. भविष्यात ही राधिका ज्वेलर्सने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना राबवून ग्राहकांचे अधिकाधिक हीत जोपासण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ड. विवेकानंद सानप यांनी याप्रसंगी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना केले.
राधिका ज्वेलर्सचे संचालक ड.अविनाश काळे, कैलास जाधव, सुरेश ढास, विकास जाधव, समर्थ हॉस्पिटलचे डॉ. विशाल काळे, रोहित ढास, प्रशांत वायभट, रजत काळे, विलास काळे, दिलीप काळे, जगन्नाथ काळे, शहादेव काळे आदींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
शेवटी भाग्यवान विजेत्या ग्राहकांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करून उपस्थित मान्यवरांनी भाग्यवान विजेत्या ग्राहकांना शुभेच्छा दिल्या.