Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनादुकानदारांनी पुर्वीच्या दरातच विक्री करावी नसता आंदोलन-थावरे

दुकानदारांनी पुर्वीच्या दरातच विक्री करावी नसता आंदोलन-थावरे


बीड (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारने रासायनीक खतांची दरवाढ केली होती. मात्र या दरवाढीचा सर्वस्तरातून निषेध होवू लागल्याने केंद्राने पुर्वीच्या दराप्रमाणे खत मिळेल असे जाहीर केले. असे असतांना काही दुकानदार आम्हाला वाढीव दरांने खत मिळाले म्हणून चढ्या भावाने खताची विक्री करु शकतात. वाढीव भावाने खत विक्री करणार्‍या दुकानदारां विरोधात कारवाई करायला हवी. तसे प्रकार घडले तर शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने तिव्र आंदोलन छेडला जाईल असा ईशारा गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी केंद्राने रासायनीक खताचे मोठ्या प्रमाणात भाव वाढ केले होते. एैन खरीप हंगामाच्या तोंडावर भाव वाढविल्याने शेतकर्‍यांत संताप व्यक्त केला जात होता. शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. शेतकर्‍यांचा रोष पाहता केंद्राने पुर्वीच्या दरानुसार खताची विक्री होईल असे घोषीत केले. असे असतांना काही दुकानदार वाढीव दरांने खताची विक्री करु शकतात. आम्हाला वाढीव दरांने खत मिळाले असे सांगून शेतकर्‍यांची लूट होवू शकते. त्यासाठी कृषी विभागाने सतर्क राहत वाढीव दराने कोणी खत विकत असेल तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. शेतकर्‍यांची लूट झाल्यास आम्ही शांत बसणार नाही तिव्र स्वरुपाचे आंदोलन करु असा ईशारा शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!