• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

अग्रलेख-‘अच्छे दिन’ सोडा ‘सच्चे दिन’ द्या

by Beed Reporter
February 26, 2023
Reading Time: 1 min read
0
विशेष संपादकीय…
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत
मो. नं. 9422742810
अच्छे दिनच्या स्वप्नावर स्वार झालेल्या भाजपाने सत्ताकेंद्र प्रस्थापित करण्याइरादे जे वार करणे सुरू केले आहे त्या वारात भारतीय राज्य घटना आणि लोकशाही नुसती जखमी होत नाही तर तिची निर्घृण हत्याच होते. हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यकाराची गरज नक्कीच नसली तरी बालबुद्धी असलेल्यांना सुद्धा भाजपाकडून स्वायत्त संस्थांचा गैरवापर होतोय, एवढे समजण्या इतपत भाजपाकडून लोकशाहीचे वस्त्रहरण सातत्याने होत आले. केवळ सत्तेच्या सेजेवर निजण्यासाठी सत्तेच्या हव्यासाची वासना शमवण्याइरादे भाजप ज्या स्तराला जातय ते पाहता या देशाचे आणि राज्याचे भविष्य काय असेल, याची चिंता वाटणे साहजिक आहे. भाजपाबांधील एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि त्यांचा एक गट शिवसेनेतून बाहेर पडत भाजपाशी संघ करत राहिला. इथपर्यंत राजकारण असू शकते. मात्र एखाद्या पक्षाशी निर्मिती, जडणघडण ही एकाने केली असेल आणि त्या निर्मिती, जडणघडणेतून एखाद्याला नाव मिळाले असेल त्या नावारुपाला आलेल्या व्यक्तीने कुरापती, शक्ती आणि युक्तीच्या बळावर तो पक्षच गिळंकृत करण्याहेतू पावले उचलले असतील तेव्हा मात्र अन्याय बोकाळलाय, असे म्हणायला वाव उरतो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडामध्ये जे काही घटनाबाह्य आणि चारित्र्यहीन राजकारण घडतय त्यातून महाराष्ट्राला अच्छेदिन तर सोडा सच्चे दिन मिळणेही मुश्किल होऊन बसले आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा असला, राजकीय काव्यांचा असला अथवा गद्दारांच्या ओतपोत कथांनी भरलेला असला तरी इथल्या इतिहासातले कर्तेकरवीते राजकारणाचा एक सृजनशील सिद्धांत मात्र सोडत नव्हते. आता स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत भारतीय जनता पार्टी सत्तेच्या हव्यासासाठी राजकारणाचा सृजनशील सिद्धांत नागवा करून जिथंतिथं झोपवत आहेत. मग ईडी असो, सीबीआय असो अथवा निवडणूक आयोग असो या संस्था भारतीय जनता पार्टीचे सर्वेसर्वा यांच्या
रखेल
बनल्या गत जेव्हा काम करतात तेव्हा अखंड हिंदुस्तानच्या भविष्याची आणि महासत्ताक म्हणून स्वप्न पाहणार्‍या त्या निरागस भारतीयांची जशी अवहेलना होते तशी भारताला भारत माता म्हणून पाहणार्‍यांच्या मनामध्ये साक्षात भारत मातेवरच बलात्कार होतोय, हे या संस्थानच्या कार्यप्रणालीवरून सातत्याने दिसून येते. पक्ष कुठलाही असो, पुढारी कुठल्याही पक्षाचा असो त्याची आजची कार्यप्रणाली ही लोकहितवादी नक्कीच नाही, परंतु भारतीय जनता पार्टी आणि त्यातील पुढार्‍यांनी ज्या पद्धतीने भारताच्या स्वायत्त संस्थानांचा वापर आपली सत्तेची वासना भागविण्यासाठी रखेलीप्रमाणे सुरू केलाय तो चिंताजनक. शिवसेना पक्षामध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे हे भाजपाचे बांधील झाले. त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणासह शिवसेनेवर हक्क मागितला आणि तो हक्क विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा यावर लोकांनी निवडून दिलेल्या आमदार, खासदारांचे संख्याबळ पाहत निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंची शिवसेना ठरवून टाकली. हा निकाल महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कुणच्याही व्यक्तीला पटणारा निकाल नव्हे. परंतु केवळ भारतीय जनता पार्टी ही देशात राज्य करते आणि त्या पार्टीचे नुमाइंदे म्हणून स्वायत्त संस्थेचे सर्वोच्च अधिकारी असतात याच एका कारणातून असे तुघलकी निर्णय लागतात. काल एकनाथ शिंदेंच्या बाजुने निकाल गेला. उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेनासह धनुष्यबाणही गेला. हा निकाल आजपर्यंतच्या कुरापती पाहता लागणारच होता तो अनपेक्षित नव्हताच, अपेक्षितच होता. परंतु निवडणूक आयोगाने ज्या रखेलीची भूमिका बजावत आपल्या भाजपेयी धन्याची सेज सजवून उद्धव ठाकरेंची जिरवल्याचा आव आणत असली तरी
धन्याच्या सेजवरच्या
निवडणूक आयोगाला
अनेक प्रश्नांचे उत्तरे द्यावे लागणार आहेत. ज्या पद्धतीने भाजप बांधील एकनाथ शिंदेंच्या बाजुने निवडणूक आयोगाने निकाल दिला ते पाहता काही प्रश्न उपस्थित होतात. त्यामध्ये
यापैकी मुख्य मुद्दा म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला दिलेले झुकते माप. शिंदे गटाकडे पक्षाचे उपनेते, विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख, प्रतिनिधी सभेतील सदस्यांचा बहुमताने पाठिंबा आहे. याशिवाय, 40 आमदार व 13 खासदारांचा पाठिंबा असल्याने त्यांच्याकडे बहुमत असल्याचा निष्कर्ष आयोगाने निकालपत्रात नमूद केला होता. हा निष्कर्ष काढताना आयोगाने आमदार आणि खासदारांना निवडणुकीत मिळालेली मतं गृहीत धरली आहेत. हा मुद्दा आक्षेपार्ह आहे. कारण, एखाद्या आमदार किंवा खासदाराला मिळालेली मतं ही सर्वस्वी त्याच्या एकट्याची असू शकत नाहीत, पक्षनेतृत्त्व, पक्षाचे धोरण यांच्याकडे बघूनही अनेक मतदार संबंधित पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतात, हे नाकारता येणार नाही तसेच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे विधानपरिषद आणि राज्यसभेतील संख्याबळ गृहीत धरलेले नाही. या मुद्द्याकडे आयोगाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आयोगाच्या निर्णयातील या दोन मुख्य त्रुटींमुळे निवडणूक आयोगाची एकतर्फी भूमिका साहजिकच समोर येते. शिंदे गटाच्या वकिलांकडून सातत्याने शिवसेना पक्षाच्या घटनेचे दाखले देण्यात आले होते. शिवसेना पक्षाच्या मूळ घटनेत बदल करुन उद्धव ठाकरे यांनी नियमबाह्य पद्धतीने पदाधिकार्‍यांची नेमणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा युक्तिवाद मान्य करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या घटनेत 2018 मध्ये केलेले बदल लोकशाहीविरोधी ठरवून आयोगाने ते ग्राह्य धरले नाहीत. पक्ष पदाधिकार्‍यांच्या निवडणुका न घेता ठाकरे यांनी नियुक्त्या केल्या. तेही अयोग्य असल्याचे मत आयोगाने नोंदविले आहे. परंतु शिंदे यांनीही ‘ प्रमुख नेता ‘ अशी निवड झाल्यानंतर त्याच पद्धतीने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तरीही शिंदे गटाला असणारा विभाग प्रमुख, जिल्हाप्रमुख यांचा पाठिंबा आयोगाने गृहीत धरला आहे. हे सरळ सरळ निवडणूक आयोगाचे सत्ता केंद्रासमोर कपडे काढून निजण्यासारखेच नव्हे काय? यासह अनेक त्रुटी आपल्याला यामध्ये पहावयास मिळते. हा अखंड हिंदुस्तानचा अपमान नव्हे काय?
अच्छे पेक्षा लुच्चे
दिनची परिस्थिती निर्माण करणार्‍या भाजपाकडून आणखी लोकशाहीच्या छाताडावर अन्यायाची किती भोके पाडायचीत हे संतापून विचारावे लागणार आहे. धर्म अथवा जात यांच्यात तेढ निर्माण करून सत्ता केंद्रे प्रस्थापीत करता येतात हे भाजपाने समजून घेऊन न उमजणार्‍या जनतेच्या भावनांशी खेळ होत असताना आता समाजातील बुद्धीजीवींनीच भारतीय जनता पार्टीचे लुच्चे दिन बंद करण्याइरादे निर्णायक भूमिका घेणे अपेक्षीत आहे. लुच्चे दिनलाच अच्छे दिनचा शालु पांघरुण कधी राम मंदिराच्या माध्यमातून, कधी देशभक्तीच्या माध्यमातून समोर आणले जात असेल आणि निर्दयीपणे भारतीय राज्य घटनेची हत्या केली जात असेल तर हे संतापजनक म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाने केवळ भाजपाच्या सांगण्यावरूएन एक पक्ष संपवण्याचा जो इरादा ठेवला तो राजकारणाचा भाग असू शकत नाही, तो सत्ताकारणाच्या वासनेत वखवखलेल्या नराधमाची इच्छा मात्र मानता येईल. परंतु हे देशासाठी नक्कीच घातक आज राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धीक परिस्थितीचा विचार, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार, अदानीसारख्या भाजपेयी दलालाचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी ही एकमेव देशाचे वाटोळे करण्यात पुढारलेली दिसते.

Previous Post

राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा-चिंचवडमध्ये मतदान संथगतीने; दुपारी एक वाजेपर्यंत कसब्यात 18.5 तर चिंचवडमध्ये 20.68 टक्के मतदान

Next Post

बीड शहरामध्ये दादागिरी वाढली; पाणी दिले नाही म्हणून तरुणास रॉडने मारहाण; धांडेनगरमध्ये घडली दिवसाढवळ्या घटना

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
बीड शहरामध्ये दादागिरी वाढली; पाणी दिले नाही म्हणून तरुणास रॉडने मारहाण; धांडेनगरमध्ये घडली दिवसाढवळ्या घटना

बीड शहरामध्ये दादागिरी वाढली; पाणी दिले नाही म्हणून तरुणास रॉडने मारहाण; धांडेनगरमध्ये घडली दिवसाढवळ्या घटना

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?