गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील कुंभारवाडी येथे घरात गांजा विक्रीसाठी आणून ठेवला असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच ठाणेप्रमुख धनंजय फराटे यांनी आपल्या टीमसह तेथे धाड टाकली असता त्याठिकाणी तब्बल दहा किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करत आरोपीलाही ताब्यात घेतले.
कुंभारवाडी येथील दादासाहेब रंगनाथ जाधव यांच्या घरी गांजा असून त्याची चोरटी विक्री होत असल्याची माहिती ठाणेप्रमुख धनंजय फराटे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आज सकाळी सात वाजता आपल्या कर्मचार्यांसह त्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी त्यांनी 10 किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी गांज्यासह आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई सपोनि. जवंजाळ, पो.उपनि. भुतेकर, सहायक फौजदार गर्जे, पो.हवालदार देवडे, परझने, गाडे, विसे, पो.ना राठोड, गुज्जर, पो.कॉ. खटाणे, ओव्हाळ, यादव यांनी केली.