Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाकारवाईच्या नावाखाली पोलीस कर्मचारी जरा जास्तच करु लागले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी ना...

कारवाईच्या नावाखाली पोलीस कर्मचारी जरा जास्तच करु लागले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी ना बदनाम करण्याचा कट आहे की काय?


बीड (रिपोर्टर)ः- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सडक फिर्‍यांना रोखण्यासाठी हा बंदोबस्त आहे. मात्र पोलीस कर्मचारी कामासाठी व रुग्णांलयात जाणार्‍या माणसांनाही विविध कागदपत्राच्या नावाखाली त्रास देवू लागले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ आज एका दुधवाल्यास हजार रुपयाचा दंड देवूनही जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबण्यात आले आहे. पोलीसांचं हे जरा जास्तच होत नाही का? पोलीस कर्मचारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी यांना बदनाम करण्याचा कट तर करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. आधिच लोक कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त आहे. त्यात पुन्हा पोलीसांचा आर्थीक आणि मानसीक ताण जास्तच लोकांना त्रस्त करु लागला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. लॉकडाऊनच्या कार्यकाळात सडक फिर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या सडक फिर्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. सडक फिर्‍यांवर कारवाई करणे योग्यच आहे. मात्र आता पोलीस ईतरांनी जाणीवपूर्वक त्रास देवू लागले. कर्मचारी, पत्रकार, दुधवाले किंवा ज्यांना दवाखान्यात जायचे आहे अशांना विविध कागदपत्राच्या नावाखाली थांबवून घेतले जात आहे. दंडाच्या पावत्या फाडल्या जात आहे. आज सकाळी शिंदे नामक दुधवाल्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर अडवले. त्यास मारहाण करण्यात आली. त्याला हजार रुपयाची पावती दिली. वरुन त्याला जबरदस्तीने गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. सदरील हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यावरुन पोलीसाचं जरा अतीच होतयं असं दिसून येत आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना बदनाम करण्यासाठी काही कर्मचारी अशा पध्दतीने लोकांशी वागत आहेत की काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिस्थितीचे भान ठेवून पोलीसांनी कारवाई केली पाहीजे. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस आर्थीक द़ृष्टया त्रस्त आहे. अशा परिस्थितीत पोलीसांचा मानसीक आणि आर्थीक त्रास वाहन धारकांना सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्यांत संताप व्यक्त केला जावू लागले आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची  मागणी केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!