बीड (रिपोर्टर) गेले आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेचे वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी संपावर आहेत. या आठ दिवसात अनेक कामे खोळंबलेली आहेत. काल कर्मचार्यांचा संप मिटला तरी आज जिल्हा परिषदेचे काही कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आले आहेत. अशांची माहिती देऊन उशिरा येणार्या कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 14 मार्चपासून वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी संपावर असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील कामकाज खोळंबले होते. काल दुपारीच हा संप मिटल्याने आज सकाळी कर्मचार्यांनी वेळेत कामावर येणे गरजेचे होते. सामान्य प्रशासन विभागातील 62 कर्मचारी हे वेळेवर आले मात्र इतर विभागातील कर्मचारी उशीरापर्यंत त्यांच्या सोयीने येत होते. ही बाब लक्षात आल्याने उशिरा येणार्या कर्मचार्यांची नोंद घेण्याचे सांगितलेले आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत या सर्व कर्मचार्यांची माहिती घेऊन शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,