Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडधारूर शहरात खते व बियाणांची चढ्या भावाने विक्री सोयाबीन बॅगची कृत्रिम टंचाई...

धारूर शहरात खते व बियाणांची चढ्या भावाने विक्री सोयाबीन बॅगची कृत्रिम टंचाई ; कृषी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष


किल्ले धारूर( रिपोर्टर) धारूर शहरामध्ये खते बियाणे यांची चढ्या भावाने विक्री सुरू आहे सोयाबीनच्या बॅगांची तर कृत्रिम टंचाई करून शेतकर्‍यांची आर्थिक लूट सुरू आहे या सर्व प्रकाराकडे कृषी अधिकार्‍यांची मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.

यावर्षी धारूर तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असल्याने धारूर च्या बाजारात शेतकर्‍यांनी खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे याचाच फायदा काही कृषी दुकानदार घेताना दिसत आहे खते व बियाण्यांची चढ्या भावाने विक्री करून शेतकर्‍यांना चांगला आर्थिक गंडा लावला जात आहे तसेच सोयाबीनचे बॅग उपलब्ध नसल्याचे सांगून जास्तीचे पैसे दिल्या बरोबर उपलब्ध करून दिल्या जातात सोयाबीन बॅक ची कृत्रिम टंचाई करून चढ्या भावाने विक्री धारूर च्या बाजारात सुरू आहे शेतकर्‍यांचे महत्त्वाच्या प्रश्नाकडे कृषी कार्यालयाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे कृषी अधिकार्‍यांचे याविषयी कुठलीही नियोजन दिसून येत नाही चढ्या भावाने विक्री होत असेल तर अशा कृषी दुकानांवर कृषी अधिकार्‍यांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे लॉक डॉउन मुळे अगोदरच दोन महिन्यापासून शेतकरी हैराण आहे बळीराजा बेजार झालेली आहे असे असताना देखील चढ्या भावाने नाईलाजास्तव शेतकर्‍यांना खते व बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे बियाण्यांसाठी तसेच सोयाबीनच्या बॅग साठी कृषी कार्यालयाचे अचूक नियोजन व्हायला हवे तरच हा चढ्या भावाने विक्रीचा पायंडा बंद होईल

Most Popular

error: Content is protected !!