भाजपात कर्तृत्वहिन नपुंसक नेतृत्व
मिंदेंनी पाटलाचा राजीनामा घ्यावा नाहीतर स्वत: द्यावा, बाबरी पाडली तेव्हाचे उंदीर आता खंदकातून बाहेर येत आहेत -उद्धव ठाकरे
मुंबई (रिपोर्टर) ज्यांच्याकडे कर्तृत्व नसतं ते कर्तृत्वाच्या चोर्या करत असतात. आता गोमुत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून बाहेर पडले. त्यावेळी हे सर्व उंदीर बिळात लपले होते. तेव्हा मोदीही नव्हते आणि तेव्हाचे भाजपा अध्यक्ष सुंदरसिंह भंडारी म्हणाले होते, ‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नाही, कदाचीत ते शिवसैनिक असतील’ हे नपुंसकर नेतृत्व आहे आणि आता भाजपाने कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या प्रश्नाचं श्रेय घ्यायला सुुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य संतापजनक आणि गंभीर असून एकतर चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणार्या पक्षासोबत राहणार्या मिंदेंनी राजीनामा द्यावा, असे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अत्यंत गरम झालं आणि त्यावर पडसाद उमटायला सुरुवात झाली. आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपासह राज्यामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले विषय गंभीर आहे, गोमुत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या आठवणीच्या खंदकीतून बाहेर पडले. आता असे उंदीर सातत्याने बाहेर पडत आहेत. त्यावेळी हे सर्व उंदीर बिळात बंद होते, तेव्हा मोदीही नव्हते, ते कुठे हिमालयात होते की अन्य कुठे हे माहित नाही. तेव्हाचे भाजपाचे अध्यक्ष सुंदरसिंह भंडारी म्हणाले होते, ‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नाही, कदाचीत ते शिवसैनिक असतील’ त्यावेळी शिवसेना-प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अभिमानाने जबाबदारी स्वीकारली होती. भाजपाचं नेतृत्व हे नपुंसक आहे, असं मी म्हणत नाही तर कोर्टही म्हणत आहे. बाळासाहेबांचं नाव घेणार्या मिंदेंना हे जमतं का? मिेंदे सत्तेसाठी लाचार होऊन गेले, त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा नाहीतर स्वत: राजीनामा दिला पाहिजे. आता कोर्टाने राममंदिराचा निकाल दिला आणि भाजप त्याचं श्रेय घेत आहे. तेव्हा मुंबईचं रक्षण शिवसेनेने केलं. खरं तर ही भाजपाची चाल आहे. बाळासाहेबांचे महत्व कमी करण्याचे षडयंत्र आहे. हे जसा मोगलांचा इतिहास पुसत आहेत तसाच हिंदुंचाही इतिहासही पुसत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.