परळी वैद्यनाथ(रिपोर्टर): आज आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरीहर तीर्थ पुढील चौकास आद्य शंकराचार्यांचे नामकरण तसेच प्रदिक्षणा मार्गास देखील आद्य शंकराचार्य यांचे नाव देण्यात आले. नवीन नामफलकाचे अनावरण राज्याचे माजी मंत्री तथा लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
परळी वैद्यनाथ नगरी आद्य शंकराचार्यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेली नगरी आहे. द्वादश पंचम् ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी आद्य शंकराचार्य परळी नगरीत आल्याची नोंद वैद्यनाथ देवल कमेटी जवळ असून शृंगेरीपीठाने वैद्यनाथ देवस्थान यांना तसे पत्र देखील पाठविलेले आहे. याचाच संदर्भ लक्षात घेत हे नामकरण करण्यात आले आहे. यावेळी वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्थ प्रा.बाबासर देशमुख, नागनाथकाका देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राजेंद्र सोनी, जयराज देशमुख, रमेश चौंडे, सचिन जोशी, रामभाऊ गोस्वामी, श्रीरामपंत जोशी, जितेंद्र नव्हाडे, मनोज रामदासी, राजीव तिळकरी, प्रदीप अग्निहोत्री, श्रीपाद पाठक, दिनेश लोंढे, ऋषीकेश नागापूरे, सुरेश राजूरकर, प्रशांत नाईक, महेश देशपांडे, दयानिधी खिस्ते, मिलिंद देशपांडे, दीपक जोशी, दत्ता गोस्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.