‘तुम लाख कोशीश करलो मुझे बदनाम करणे की, मै जब जब बिखरा हूँ तब तब दुगुनी रफ्तार से निखरा हुँ’ हा शेर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी नवा नाही. मात्र जेव्हा जेव्हा कर्तव्यनिष्ठ आणि एकनिष्ठ माणसांना बदनाम करण्यात येते तेव्हा तेव्हा या दोन ओळीची आठवण त्या एकनिष्ठतेच्या मनात उफळून येते. तीच आठवण डॉ. बाबू जोगदंड यांना नक्कीच झाली. काल जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला अन् निकालातून आपल्या कर्तव्यनिष्ठते बरोबर एकनिष्ठतेच्या कामाला आलेले यश हे बदनाम करणार्यांच्या कानसुलात मारण्यासारखे म्हणावे लागेल.
आ. संदीप क्षीरसागर यांचे एकनिष्ठ खंदे समर्थक
राहिलेले बाबू जोगदंड यांनी मार्केट कमिटीच्या
निवडणुकीत विरोधकांना घाटाचे पाणी पाजले.
विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत सुरुवातीपासून सावलीसारखे राहणारे डॉ. बाबू जोगदंड यांना गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडात अनेकांनी पाण्यात पाहिले. विरोधकांनी जेवढे त्रासून सोडले नाही तेवढे आप्तस्वकियांनी त्रासून सोडले होते मात्र अशा स्थितीतही सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानलिये नाही बहुमता म्हणत आपली संदीप क्षीरसागरांसोबतची एकनिष्ठता कायम ठेवली. संदीप क्षीरसागर आमदार झाल्यानंतर अनेक घटनाक्रम घडले. क्षीरसागरांपासून अनेक जण दुरावले. मात्र डॉ. बाबू जोगदंड यांनी आमदाराची साथ सोडली नाही. जे गेले ते गेले, कर्तव्य उरले, या उक्तीनुसार बाबू जोगदंड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शरद पवारांचे विचार घराघरात पेरते राहिले. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची घोषणा झाली अन् आ. संदीप क्षीरसागरांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डॉ. जोगदंड यांनी निवडणुकीची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. विरोधकांची मोट बांधण्यापासून एकीच्या बळाचे महत्व सांगण्यापर्यंत डॉ. जागेदंड आघाडीवर राहिले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले अन् कधी नव्हे अशी विश्वासात्मक विरोधकांची एकी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पहायला मिळाली. या विश्वासात्मक एकीचे फलित निकालात दिसून आले. तेव्हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या सर्वच विरोधकांना नक्कीच आत्मिक समाधान झाले. मात्र या सर्वांना आत्मिक समाधान देण्यासाठी पडद्या आडून ज्याने महत्वपूर्ण काम केले ते बाबू जोगदंडच. निवडणुकीची व्यूहरचना आखताना विरोधक काय करतात, हे पाहण्यापेक्षा मतदारांची निकड काय, गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून संबंधित संस्थेवर एकहाती सत्ता का? याचा अभ्यास डॉ. जोगदंड यांनी करून बालाघाटावरच नव्हे तर बीड शहर आणि अन्य भागातही प्रत्येक मतदाराशी भेट घेऊन त्यांनी जे गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात काम केले ते आ. संदीप क्षीरसागरांच्या गटाला गुलाल लावणारे ठरले. आमदारापासून जे जे बाजुला सरकले त्या सर्वांनी बाबू जोगदंड यांना जाणीवपुर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत जोगदंड यांनी ज्या पद्धतीने एकनिष्ठतेला महत्व देत बदनाम करणार्यांना घाटाचे पाणी पाजले.