बीड (रिपोर्टर)ः-क्रांतीनगर बीड येथील रहिवासी शेख ज़मीर मुनीर यांचे किडनी आजाराचा उपचार सुरू असताना बदनापुर जिल्हा जालना येथील नूर मेडिकल कॉलेज येथे रात्री 12 वाजता दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 35 वर्ष होते. त्यांची नमाज़ ए जनाज़ा दुपारी 2:00 वाजता तकिया मस्जिद येथे अदा करण्यात येईल. दफनविधी तकीया मस्जीद येथेच करण्यात येईल. शेख जमीर यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. अत्यंत कमी वयात झालेल्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख जमीर हे पत्रकार रफिक नाशाद यांचे भाच्चे होते. शेख कुटूंबीयांच्या दुखाःत रिपोर्टर परिवार सहभागी आहे.