बीड । रिपोर्टर
शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची नेहमीच बोटचेपी भूमिका असते, त्यातून शिक्षण संस्था चालक पवार यांनी ‘मोशन’ नावाचे राजस्थान येथील ‘कोटा’ हा ब्रँड असलेले कोचिंग क्लासेस बीडमध्ये सुरू केले अहे. स्वत:च्या कोचींग क्लासेसला मुले मिळविण्यासाठी इतर शिक्षक जे कोचिंग क्लास घेतात ते तात्काळ बंद करावे याासाठी काल पवार यांनी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ घातला.
बीड शहरात क्लासेसचा धंदा तेजीत आला आहे. त्यातूनच अनेक जण नामांकित कोचिंग क्लासचे ब्रँड बीड शहरात आणतात आणि धंदा करतात. त्यातच विजय पवार या संस्था चालकाने मोशन क्लासेसचा ब्रँड बीड शहरात आणला. जे विनाअनुदानित शिक्षक पगार मिळत नसल्याने शिकवणी घेऊन आपली उपजिविका भागवतात अशा शिक्षकांचे शिकवणी वर्ग बंद करावेत, म्हणून काल पवार यांनी शिक्षण विभागात गोंधळ घातला. महिला अधिकार्यासोबतही वादग्रस्त वर्तन केले. याला शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांची बोटचेपी भूमिका कारणीभूत आहे.