परळी (रिपोर्टर) परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उपसभापती पदाची आज निवडणूक प्रक्रिया पारपडली यामध्ये सभापतीपदी सूर्यभान नाना मुंडे तर उपसभापतीपदी भाग्यश्री जाधवयांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजीमंञी धनंजय मुंडे साहेब व गटनेते वाल्मिक कराड साहेबांनी माझ्यावर टाकलेला जो विश्वास आहे तो तो विश्वास सार्थक करणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती सुर्यभान मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले. आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती उपसभापती निवडीची प्रक्रिया तहसीलदार तथा प्राधिकृत सुरेश शेजुळ यांच्या अध्यक्षेतेखाली ही निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली.या निवडणुकीत सभापती पदासाठी सुर्यभान मुंडे तर उपसभापती पदासाठी यांचेच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची
बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली या निवडणुकीच्या प्रक्रियेत नवनिर्वाचित सदस्य अशोक डिघोळे,दताञय देशमुख,प्रभाकर दहिफळे,राजाभाऊ पौळ, भाऊसाहेब नायबळ,लक्ष्मण पौळ,रणजित सोळंखे, कमलबाई फड, बळीराम कस्तुरे,रामभाऊ गिराम,भगवान फड, राजाभाऊ जगताप, गडदे ज्ञानोबा,सुरेश मुंडे,जयपाल लाहोटी,सुग्रीव गित्ते यांनी सभापती व उपसभापती निवडी करिता बिनविरोध पाठिंबा दिल्याने ही निवड खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी बाजार समितीचे प्रशासक पोतंगले व्हि.एल.सचिव बलवीर रामदासी,हिशोबनिस गोविंद मुंडे हे उपस्थित होते