शांताई हॉटेलच्या पाठीमागे घर फोडून 21 हजार पळविले
बीड (रिपोर्टर) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोर्यांचे सत्र थांबता थांबेना. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत आहे. पोलीस प्रशासन नेमके करते काय? असा संतप्त सवाल व्यक्त केला जाऊ लागलाय. शांताई हॉटेलच्या पाठीमागे बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 21 हजार रुपये लंपास केले.
दत्ता पुरी हे नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेल्याने त्यांच्या घरी कोणी नव्हते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी 21 हजार रुपये चोरून नेले. परत आल्यानंतर पुरी यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडू लागल्याने नागरिकांसह व्यापार्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.