शेतकर्यांची लूट करणार्या व्यापार्यांचे पितळ उघडे पाडले; दोषी व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई होणार
नेकनूर (रिपोर्टर)ः- नेकनूरच्या आठवडी बाजारात काही व्यापार्यांकडून शेतकर्यांची लूट होत असल्याची तक्रार बाजार समितीकडे करण्यात आली होती. त्यानूसार बाजार समितीच्या सभापतींनी बाजार जावून स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी काही व्यापारी शेतकर्यांची लूट करत असल्याचे दिसून आले. कमी भावाने माल खरेदी करण्यात येत असल्याचा प्रकार निर्दशनास आल्यानंतर सदरील व्यापार्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विना परवाना धान्य खरेदी करणार्या व्यापार्यांना चाप लावण्यात येणार आहे.
नेकनूरचा आठवडी बाजार मोठा असतो. या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. येथील काही व्यापारी शेतकर्यांची आर्थीक लूट करत असल्याची तक्रार बाजार समितीकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल सभापतींनी घेतली. आज सकाळी बाजाराची पाहणी केली असता. काही व्यापारी शेतकर्यांचा माल कमी भावाने खरेदी करत असल्याचे दिसून आले. तर अनेकांकडे लायसन्न नव्हते. भूसार माल खरेदी केद्राच्या मापाची पाहणी करण्यात आली.भूसार माल खरेदीवर आडता दोन किलो एैवजी एक किलो घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. विना परवान खरेदी करणार्या व्यापार्यांना तात्काळ परवान देण्याचे आदेश देण्यात आले. यासह इतर सुचना करण्यात आल्या. दोषी व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या स्टिंग ऑपरेशनमुळे व्यापार्यात एकच खळबळ उडाली. यावेळी सभापती सरलाताई मुळे, उपसभापती शामसुंदर पडुळे, डॉ.बाबु जोगदंड, सचिव हारुन पठाण, संचालक धनंजय गुंदेकर, कर्मचारी, माजी पंचायत समिती सदस्य अनिल जाधव, ओम वाघमारे सह आदिंची उपस्थिती होती.