बीड (रिपोर्टर) खुनातील आरोपींना बीड ग्रामीण पोलिसांचे अभय असून त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेले नाही. आरोपींच्या अटकेसाठी चर्हाटा येथील एक कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलं आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.
बाळु चव्हाण व अन्य एका जणाविरोधात बीड ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊनही तपासी अधिकारी आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करत आहे. उलट गुन्हा मागे घ्यावा म्हणून दबाव आणण्याचे काम केले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक वैभव रणखांब हे जाणीवपुर्वक या प्रकरणामध्ये टाळाटाळ करत असून आरोपीच्या अटकेसाठी दिनकर गंगाराम उबाळे व इतर नागरीक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. यामध्ये काही लहान लेकरांचा सुद्धा समावेश आहे.