आरोपीविरोधात गुन्हा दाखल
नेकनूर (रिपोर्टर) नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक धाब्यांवर अनाधिकृतपणे देशी-विदेशी दारूची विक्री होते. पोलिसांनी दोन ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश सुरेश राहींज व सुंदर खोसे यांच्या हॉटेलवर नेकनूर पोलिसांनी धाड टाकली असता राहींज यांच्याकडे 3 हजार 740 रुपयांची तर खोसे यांच्या धाब्यावर 2 हजार 960 रुपयांची दारू आढळून आली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई शेख मुस्तफा यांच्या मार्गदर्शनाखाली खटाणे, सचीन वंजारे यांनी केली आहे.