जिवणे यांच्याकडे गेवराई महसूल विभाग देण्याची मागणी
बीड (रिपोर्टर) प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी जिवणे यांच्याकडे एक महिन्यासाठी बीड पंचायत समितीचा गटविकास विकास अधिकारी पदाचा कारभार देण्यात आला होता. त्यांचा कार्यकाळ उद्या संपत असून त्यांच्याकडे महसूल विभागाचा चार्ज दिला जाणार आहे. गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळुचा अनाधिकृत उपसा होत असून या ठिकाणचा कारभार त्यांच्याकडे देण्याची मागणी होऊ लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी जिवणे हे बीड येथे आलेले आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे विविध पदभार देण्यात आलेले आहेत. एक महिन्यासाठी बीड पंचायत समितीचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. उद्या (पान 7 वर)
त्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्याकडे महसूल विभागाचा चार्ज दिला जाण्याची शक्यता असून गेवराई महसूल विभाग त्यांच्याकडे द्यावा, अशी मागणी होऊ लागलीय. गोदा पात्रातून अनाधिकृत वाळुचा उपसा सुरू आहे. त्यांच्याकडे या ठिकाणचा चार्ज दिला तर ते नक्कीच वाळू माफियांना सरळ करू शकतात.