निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी पदभार स्वीकारला
बीड (रिपोर्टर): राज्यातील काही उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश काल राज्य सरकारने काढले. त्यात गेल्या अडीच वर्षांपासून कार्यरत असलेले निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची बदली झाली असून यापुर्वी बीड जिल्ह्यात कार्यरत असणारे स्वामी यांची नियुक्ती बीड येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
स्वामी यांनी यापुर्वी अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सलग तीन वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना बीड जिल्ह्यातील भौगोलिक आणि इतर बाबींचा चांगल्या अभ्यास आहे. उस्मानाबाद येथे ते उपजिल्हाधिकारी म्हणूनच कार्यरत होते. एक सकारात्मक अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख आहे. आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. महसूल विभागाच्या कर्मचारी संघटनेने त्यांचे स्वागत केले आहे.