Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडबदली झालेल्या लेखापरिक्षक फासेंना मंत्री बँकेचा मोह सुटेना सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण...

बदली झालेल्या लेखापरिक्षक फासेंना मंत्री बँकेचा मोह सुटेना सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण यांची शासनाकडे लेखी तक्रार


बीड, दि.१७ (प्रतिनिधी) ः- जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-१, बी.एस.फासे यांची शासनाने दि.३० जुलै रोजी उस्मानाबाद येथे बदली केली आहे. द्वारकादास मंत्री नागरी बँकेच्या चाचणी लेखा परिक्षणाचे आदेश त्यांना सहकार विभागाने माहे मार्च २०२१ मध्ये दिले होते. मंत्री बँकेच्या वैधानिक लेखा परिक्षण अहवालातील गंभीर आक्षेप आणि रिजर्व बँकेच्या तपासणीतील गंभीर बाबी यांचा यामध्ये समावेश होता. विहित मुदतीत चाचणी लेखा परिक्षण पूर्ण न करणार्या फासे यांनी बदली नंतर या कामासाठी संशयास्पद रितीने मुदतवाढ मागितली असून त्यांना मंत्री बँकेचा मोह सुटेनासा झाल्याची लेखी तक्रार बळवंत चव्हाण यांनी केली आहे.
द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष, संचालक व इतरांनी बँकेचा पैसा बिनव्याजी वापरल्या प्रकरणी संबंधितांकडून ९२१८.७२ लाख रुपये वसुल करणे बाबतचा अहवाल वैधानिक लेखा परिक्षकांनी माहे डिसेंबर २०२० मध्ये शासनास सादर केला आहे. त्याचबरोबर वैधानिक लेखा परिक्षकांनी सहकार कायद्यातील कलम ११० ए, ८३ व ८८ नुसार कारवाई करण्याची शिफारस वैधानिक लेखा परिक्षकांनी केली आहे. आदित्य शिक्षण संस्था व आदित्य ग्रुप मधील ३८६ कर्मचार्यांच्या नावे बेकायदेशीररितीने कर्जवाटप करून रक्कम उचलल्या प्रकरणी भारतीय रिजर्व बँकेच्या तपासणी अहवालामध्ये गंभीर स्वरुपाचे आक्षप नोंदविण्यात आले आहेत, यांसह इतर गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बळवंत चव्हाण पाटील यांनी शासनाकडे लेखी स्वरुपात पुराव्यासह केली होती.याप्रकरणी बँकेच्या चाचणी लेखापरिक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्त यांनी जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग-१ बी.एस.फासे यांना ३ मार्च २०२१ रोजी दिले होते. त्यानंतर दोनवेळा या आदेशामध्ये काही अतिरिक्त मुद्यांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी दिलेल्या मुदतीत फासे यांनी हे काम पूर्ण केले नाही. अलिकडच्या काळात मंत्री बँकेच्या अध्यक्ष व इतरांशी त्यांची झालेली सलगी व संशयास्पद हालचाली लक्षात घेता
तक्रारदारांच्या मनात लेखा परिक्षकांबद्दल संशय निर्माण झाला. शासनाच्या एखाद्या अधिकार्याची बदली झाल्यानंतर त्याने तात्काळ आपला पदभार नियमाप्रमाणे इतर अधिकार्याकडे सोपवून बदली झालेल्या ठिकाणी हजर होणे अपेक्षित असताना लेखा परिक्षक फासे मात्र मंत्री बँकेच्या चाचणी लेखा परिक्षणासाठी (पान ७ वर)
मुदतवाढ मागून तोपर्यंत कार्यमुक्त करण्यात येवू नये अशी विनंती आयुक्तांकडे करत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयीच्या शंकेचे दृढीकरण होत असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. फासे यांच्याकडील पदभार तात्काळ काढून पारदर्शकपणे इतर अधिकार्याकडून बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी शेवटी बळवंत चव्हाण यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!