Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवीस आणि चाळीस टक्के वाल्यांची पुन्हा फरफट पगारीसाठी पैसे नाहीत

वीस आणि चाळीस टक्के वाल्यांची पुन्हा फरफट पगारीसाठी पैसे नाहीत


बीड (रिपोर्टर):- ज्यांचे पोट भरले आहे, त्यांनाच पुन्हा भरपेट जेऊ घालायची सवय आपल्या सरकारला लागलेली आहे. शंभर टक्के पगार ज्या शिक्षकांना मिळतो, त्यांचा नियमित पगार होतो, त्यांच्याबाबत आम्हाला काही म्हणणे नाही मात्र जे २० वर्षांपासून उपाशी आहेत त्यांना अर्धा घासही हे सरकार वेळेवर खाऊ घालत नाही. २० आणि ४० टक्के ज्यांना अनुदान प्राप्त आहे अशा शिक्षकांचे पगार गेल्या तीन महिन्यांपासून झालेले नाहीत. याबाबत पे युनिटला विचारणा केली असता ते याबाबत म्हणतात, ‘शालेय शिक्षण विभाग आणि अर्थ विभागाने बजेटची तरतूद केलेली नाही, जोपर्यंत बजेट येत नाही तोपर्यंत या २० टक्के आणि ४० टक्के वाल्यांची पगार करता येणार नाही.’
गेल्या एक वर्षभरापुर्वी राज्यात दोन ठिकाणी झालेल्या शिक्षक मतदार संघात सत्ताधारी आमदाराला शिक्षकांनी त्यांची जागा दाखवून दिली तरीही उर्वरित पदवीधर आणि शिक्षक आमदारांना जाग येत नाही. मराठवाडा शिक्षण विभागाचे आमदार विक्रम काळे यांना तर वाटते की आपल्याच सर्व शिक्षण संस्था आहे आणि सर्व शिक्षण संस्था चालक आपल्याच खिशात आहेत. त्यामुळे संस्था चालकाला सांगितले की, शिक्षक मतदार आपल्या मतदान करतात या आविर्भावात नेहमीच काळे असतात. तब्बल २० वर्षांपासून काही शिक्षकांना अनुदान नाही तर काही शिक्षकांना २० आणि ४० टक्के पगार मिळतो. या शिक्षकांना अर्थविभागाने शिक्षण विभागाला पैसे दिले नाहीत त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून जिल्ह्यातील २० आणि ४० टक्के पगार उचलणार्‍या शिक्षकांना पगार मिळत नाही. ही बाब राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेऊन या शिक्षक वर्गासाठी बजेटची तरतूद तात्काळ करावी आणि पगार नियमित करावे, अशी मागणी शिक्षक वर्गातून होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!