परळी (रिपोर्टर) परराज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बॅन करण्यात आलेली दारू सर्रासपणे विक्री होत असल्याचे उघड होत असून काल मध्यरात्री परळी-अंबाजोगाई रोडवरील बायपास चौकात संशयास्पदरित्या उभ्या असेल्या कारची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता कारसह एका पिकअपमध्ये केवळ गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेली आणि महाराष्ट्रात बंदी असलेली लाखो रुपयांची मॅकडॉवअल कंपनीची दारू मिळून आली. या कारवाईत 2 लाखांच्या आसपास दारू जप्त करण्यात आली असून सदरची कारवाई ही परळी शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी करून तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी-अंबाजोगाई रोडवरील बायपास चौकात पांढर्या रंगाची कार संशयास्पदरित्या उभी असून तिच्या जवळच पिकअप उभे असल्याची माहिती परळी पोलिसांना झाली. तेव्हा पोलिसांनी सदरील कारसह पिकअपची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेली प्रतिबंधित दारू आढळून आली. ज्यामध्ये मॅकडॉअल कंपनीची 1 लाख 7 हजार 520 रुपयांच्या 1 हजार 680 बाटल्या, रॉयलस्टॅग कंपनीच्या 240 बाटल्या असा एकूण दीड ते दोन लाखांची दारू जप्त करण्यात आली असून या वेळी पिकअप क्र. एम.एच. 25 पी. 0209 व डिझायर कंपनीची कार एम.एच. 46 ई.डी. 5603 या जप्त करण्यात आल्या असून सदरची कारवाई ही गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बायपास चौक अंबाजोगाई रोडवर करण्यात आली. या वेळी दत्तात्रय भिकाजी वाघमारे (वय 44, रा. रत्नापूर पो.येरमाळा जि. उस्मानाबाद), व्यंकटेश नागनाथ गंजेवार (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई), रोहन राजाभाऊ जाधव (रा. भगवानबाबा चौक, अंबाजोगाई) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भारगव सपकाळ, सहायक पो.नि. गोसावी, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, घटमल, लोहबंदे, पांचाळ यांनी केली. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम 420, 334, भा.दं.वि.सह कलम 65 ई मो.प्रो. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुटखा बीडमध्ये आला कसा? तो कुठे वितरीत केला जाणार होता, यातील मुख्य सुत्रधार कोण? यासह गुटख्याच्या मुळाशी जाण्यासाठी आरोपीचा पीसीआर मागणार असल्याचे पो.नि. कस्तुरे यांनी सांगितले.