Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडरमेश पोकळे यांच्यावरील कारवाईची घोषणा चंद्रकांत पाटील करतील -फडणवीस शिरीष बोरळकर मुंडे...

रमेश पोकळे यांच्यावरील कारवाईची घोषणा चंद्रकांत पाटील करतील -फडणवीस शिरीष बोरळकर मुंडे साहेबांचे उमेदवार


औरंगाबाद (रिपोर्टर)- शिरीष बोराळकर हे भाजपाचे उमेदवार आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. रमेश पोकळे हे भाजपाचे उमेदवार नाहीत त्यांनी बंडखोरी केली आहे भाजपाची समिती त्यांच्यावर काय कारवाई करायची ती करेल याची घोषणा चंद्रकांत पाटील करतील असे म्हणत बोराळकर हे मुंडे साहेबांचे उमेदवार असून पंकजा मुंडे ह्या त्याच्या साक्षीदार आहेत असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले.
ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते या वेळी त्यांच्या सोबत पंकजा मुंडेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी पंकजा मुंडे, शिरीष बोराळकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातल्या ठाकरे सरकारने मराठवाड्याकडे गेल्या वर्षभराच्या कालखंडात दुर्लक्ष केले आहे. ज्या योजना आम्ही आखल्या होत्या त्या त्यांनी रद्द केल्या, त्यामुळे मराठवाड्यातील जनता या सरकारविरोधात नाराज आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी होणार आहे. मराठवाड्यामध्ये शिरीष बोरळकर हे भाजपाचे उमेदवार असून त्यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभीअ ाहे. रमेश पोकळे हे भाजपाचे उमेदवार नाहीत, त्यांनी बंडखोरी केली आहे. भाजपामध्ये अनुशासन समिती असून या समितीकडे रमेश पोकळे यांच्या बंडखोरीचा विषय गेलेला आहे. कोणावर काय कारवाई करायची हे ही समिती ठरवेल आणि याबाबतची घोषणा भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील करतील, असे म्हणत फडणवीसांनी रमेश पोकळे हे बंडखोर असल्याचे सांगितले तर पंकजा मुंडेंच्या नाराजीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या वेळेस तुम्हाला बातम्या नसतात तेव्हा पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या बातम्या येतात. शिरीष बोरळकर यांच्या नावाला त्या कधीच विरोध करणार नाहीत. ज्या वेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो तेव्हा स्व. मुंडे साहेबांनीच सांगितलं होतं, शिरीषला तिकिट द्यायचे आहे, याच्या त्यासाक्षीदार आहेत हे सर्वांना माहित आहे. त्या दिवशी त्या मेळाव्याला येणार नाहीत, ते त्यांनी आधीच सांगितलं होतं. विशेष म्हणजे बोरळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!