Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीड‘तरी सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करू नका’- ना. धनंजय मुंडे

‘तरी सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करू नका’- ना. धनंजय मुंडे

बीड (रिपोर्टर)- ’विधानसभा निवडणुकीच्या वेळी फोडाफोडी करणार्‍या भाजपला आम्ही सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करू नका. पण सुधारणार नाहीत. आता ’पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है,’ असा सणसणीत टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपला हाणला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी आंबाजोगई येथे आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार आसूड ओढले. ’महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर मला एकानं लोकशाही काय आहे, असा प्रश्न विचारला होता. मी त्याला म्हणालो, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर या देशाला लोकशाही दाखवली आहे. ५६ आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, ५४ आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, ४४ आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि १०५ आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, याला लोकशाही म्हणतात. पवारसाहेबांनी हे दाखवून दिलं असून कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व आहे,’ असं मुंडे म्हणाले. ’करोनापासून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला आपण वाचवतोय. त्याचप्रमाणं, भाजपच्या संसर्गातून सुद्धा तुम्हाला यापुढं आपल्या कुटुंबाला दूर ठेवावं लागेल,’ असा खोचक टोलाही त्यांनी हाणला. दुसरीकडं, मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपवर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली. ’भाजपवाले रोज मंदिरात जातात. सर्वात जास्त पापी यांच्याच पक्षात आहेत. लोकांच्या मुली पळवून आणण्याची भाषा करणार्‍यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करावे का?,’ असा सवाल मिटकरी यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!