Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईसरकार महावितरण कंपनीच्या माध्यमातून जनतेची लूट करतयं गेवराईत भाजपाचे आंदोलन

सरकार महावितरण कंपनीच्या माध्यमातून जनतेची लूट करतयं गेवराईत भाजपाचे आंदोलन


गेवराई (रिपोर्टर) लॉकडाऊनच्या कार्यकाळात सामान्य नागरिक व व्यापारी यांनी विजेचा वापर न करता महावितरण कडून आलेल्या अव्वाच्या सव्वा विजबिला मुळे सामान्य नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. मात्र आघाडी सरकार महावितरण कंपनीच्या माध्यमातून जनतेची लूट करत आहे. यांना धडा शिकविण्यासाठी व विजबिल माफ करावे यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यभरात वीज बिल होळी आंदोलन सुरू असून गेवराई येथील महावितरण कार्यालय सकाळी अकरा वाजता आ.लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विजबिल होळी आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे,जि.प.सदस्य प्रल्हाद माने,नगराध्यक्ष सुशील जवंजाळ,उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर,नगरसेवक राहुल खंडागळे, भरत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सचिन मोटे,राजाभाऊ तिपाले,बाळासाहेब सानप,समाधान मस्के, योगेश मोटे,माऊली पवार,मनोज हजारे,विष्णूपंत घोंगडे, नितीन शेटे,ईश्वर पवार,शोएब आतार,दशरथ पंडित,गौरव खरात यांच्यासह नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान यावेळी मुख्य अभियंता यांना निवेदन देत महाविकास आघाडी सरकारच्या नावाने घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून विजबिलाची होळी करण्यात आली.

Most Popular

error: Content is protected !!