केज मतरारसंघात येवता, कोठी, धोतरा येथे प्रत्येकी 12 लाखांच्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन
केज (रिपोर्टर): शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप शिवसेनेच्या युती सरकारची वर्षपूर्ती झाली आहे. यानिमित्ताने सरकारच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरूच रहाणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.
केज तालुक्यातील येवता, कोठी, धोतरा येथे प्रत्येकी 12 लाखांच्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, केज तालुक्यासह मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसह शेतकर्यांना वैयक्तिक लाभ दिले आहेत. माझ्याकडे ग्रामस्थांनी अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तिन्ही गावातील अंगणवाडीचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे या भागातील बालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना हक्काचे छत्र मिळणार असून परवड थांबणार आहे. प्रत्येक इमारतीसाठी 12 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून प्रत्यक्षात काम सुरू होत आहे. हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे व्यक्तिशः मला समाधान आहे. या भागातील शेतकरी, सर्वसामान्यांनी त्यांच्या काही समस्या असल्यास पदाधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी केले आहे. यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले, तालुकाप्रमुख पंजाब देशमुख, वैभव जाधव, डॉ.बुडुक, शहर प्रमुख बालासाहेब पवार, सुग्रीव सक्राते, महेंद्र चाटे, दादा नेहरकर, तानाजी धस, आकाश बहीर यांच्यासह तीन गावातील शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.