Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमकाळेगाव येथील विद्यार्थी औरंगाबादमधून बेपत्ता

काळेगाव येथील विद्यार्थी औरंगाबादमधून बेपत्ता


मस्साजोग (रिपोर्टर)- केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील २२ वर्षीय विद्यार्थी शिक्षणासाठी औरंगाबाद येथे गेलेला होता. तो १५ ऑगस्ट रोजी एमजीएम हॉस्पिटल-समोरील अपार्टमेंटमधून फोनवर बोलत खाली आला, तेव्हापासून तो बेपत्ता असून यासंदर्भात सिडको पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या मित्राने नोंदवली आहे.
केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील रोहीत रतन कोठावळे हा विद्यार्थी शिक्षणासाठी एमजीएम कॉलेज औरंगाबाद येथे राहत होता. एमजीएम हॉस्पिटलच्या समोरील पारितोषिक अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी १२ वाजण्याच्या सुमारास तो मित्राला फोनवर बोलत खाली आला. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता आहे. यासंदर्भात त्याचा मित्र संकल्प संजय ठाकरे (औरंगाबाद) याच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!