Friday, January 28, 2022
No menu items!
HomeUncategorizedबीड पोलीस दलात मोठे फेरबदल

बीड पोलीस दलात मोठे फेरबदल


तीन निरीक्षक, 19 सहायक निरीक्षकांसह 9 फौजदारांच्या बदल्या, अनेकांना मिळाली ठाणे प्रमुखाची संधी
बीड (रिपोर्टर)- बीड पोलीस दलात बदलीचे वारे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होते. अखेर रात्री उशीरा पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी बीड जिल्ह्यातील निशस्त्र पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून यामध्ये अनेकांवर ठाणे प्रमुखाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यामध्ये 3 निरीक्षक, 19 सहायक निरीक्षक तर 9 फौजदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.


31 ऑगस्यपर्यंत बीड जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्या पुर्ण करण्याची जबाबदाररी पोलीस अधिक्षकांवर होती. त्यानुसार रात्री उशिरा पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि फौजदारांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक भागवत ज्ञानदेव फुंदे यांच्याकडे देण्यात आली आहे तर जीवी शाखेची जबाबदारी अंबाजोगाई ग्रामीणचे महादेव पांडुरंग राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे तर जीवी शाखेचे वासुदेव मोरे यांच्याकडे अंबाजोगाई ग्रामीणचा पदभार देण्यात आला आहे तर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीनगरचे नितीन पाटील यांची धारूर, संभाजीनगर परळीचे गोरक्ष पालवे यांची अंमळनेर, अंबाजोगाईचे अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयातील वाचक पोलिस निगरीक्षक रोहीत बेंबरे यांची अंभोरा, बीड शहरचे मुस्तफा इस्माईल शेख यांची नेकनूर येथे, परळी शहरचे अशोक खरात यांची बर्दापूर, अप्पर पोलीस अधिक्षक वाचका शाखा बीड येथील बाळासाहेब आघाव यांची पिंपळनेर पोलीस ठाणे येथे, बीड शहरचे भास्कर नवले चकलांबा, धारूरच्या सुरेखा धस यांची अनै.मा.वा.प्र.कक्ष बीड, अंमळनेरचे शामकुमार डोंगरे अप्पर पोलीस अधिक्षक वाचक शाखा बीड, अंभोरा ठाण्याचे ज्ञानेश्‍वर फुकलादे स्थानिक गुन्हे शाखा बीड, नेकनूरचे लक्ष्मण केंद्रे माजलगाव शहर, बर्दापूरचे रविंद्र शिंदे अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय अंबाजोगाई, पिंपळनेरचे शरद भुतेकर पो.नि. क.बीड, चकलांब्याचे विजय देशमुख आष्टी, पो.नि.क.बीडचे रामदास पालवे माजलगाव शहर, पे.नि.क.बीडचे महादेव ढाकणे बीड शहर, पो.नि.क. बीडचे गणेश धोकरट आरसीपी पथक बीड, पो.नि.क.बीडचे अण्णासाहेब खोडेवाड पो.स्टेशन परळी ग्रामीण, पो.नि.क.बीडचे विजयसिंग जोनवाल पो.स्टेशन माजलगाव ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे तर फौजदारांमध्ये पाटोद्याच्या वैशाली प्रवीण पेटकर माजलगाव शहर पिंक मोबाईल पथक, शिरूरच्या राणी सानप यांची आष्टी पिंक पथक, गेवराई उपविभागीय पोलीस अधिक्षक वाचक शाखेचे रफियोद्दीन अजिमोद्दीन वाचक उपविभागीय पोलीस अधिक्षक आष्टी, उपविभागीय पोलीस अधिक्षक वाचक शाखा बीड येथील रियाजोद्दीन जैनोद्दीन शेख यांची पोलीस स्टेशन युसुफवडगाव, युसुफवडगाव येथील सिमाली कोळी केज पिंक पथक येथे, पोलीस निरीक्षक क. बीड येथील सुनिल बोडखे यांची वाचक शाखा गेवराई, पो.नि.क.बीड येथील ज्ञानेश्‍वर राहडकर यांची वाचक शाखा बीड तर अ.चौ.शाखा पोअका बीड येथील गंगाधर दराडे यांची पो.स्टेशन पेठ बीड येथे बदली करण्यात आली आहे. याचे आदेश पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी रात्री उशिरा काढले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!