बीड (रिपोर्टर): बीड शहरातले काही रस्ते अत्यंत खराब जाले असून मोठ्या प्रामणावर खड्डे पडलेले आहेत. ते रस्ते तात्काळ करण्यात यावेत, यासाठी मनसेच्या वतीने कधी गांधीगिरी तर कधी वेगवेगळे आंदोलन केले जात असतानाच आज मनसैनिकांनी थेट नगरपालिकेवर हल्लाबोल केला. नगरपालिकेच्या सीओ निता अंधारे यांच्या थेट कॅबिनेमध्ये घुसखोरी करत त्यांच्या समोर त्यांच्याच कॅबिनची तोडफोड केली. अचानक घोषणाबाजी आणि तोडफोडीने सीओ नीता अंदारे या आपल्या चेअरवरून उठल्या, भयभभीत होत मनसैनिकांची तोडफोड डोळ्याने पहात बसल्या. त्याक्षणी त्यांनी भ्रमणध्वनीवरून थेट पोलीस अदिक्षकांना फोन केल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसात सुरू होती. दुसरीकडे नगरपालिकेच्या सीओंच्या उपस्थितीत झालेला प्रकार जेवढा गंभीर तेवढेच बीड शहरातल्या अमरधाम ते सह्याद्री हॉस्पिटल रस्त्याची दुर्दशाही तेवढीच बिकट म्हणावी लागेल.
अमरधाम स्मशानभूमी ते सह्याद्री हॉस्पिटल शिवशारदा बिल्डिंग जालना रोड या दरम्यानचा रस्ता खराब असल्यामुळे तो तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष करण लोंढे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन सुद्धा केले होते. मागणी करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांंनी न.प. कार्यालयात येऊन सीओंच्या कॅबिनमध्ये जावून त्यांच्या कॅबिनच्या काचा फोडत खुर्च्यांची मोडतोड केली. या घटनेने नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती शहर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आश्वासन देऊनही त्यांनी तोडफोड केली -सीओ अंधारे
रस्त्याच्या संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन दिले होते. याबाबत आपण त्यांना आश्वासन दिले होते की हा रस्ता नगर उत्थान योजनेअंतर्गत प्रस्तावीत आहे. या योजनेच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करू, असे सांगितले होते, तरी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात येऊन तोडफोड केल्याचे सीओ अंधारे यांनी म्हटले आहे.