Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडगांव-गांवच्या नद्यांना महापुर, संपर्क देखील तुटला उर्ध्व कुंडलिकाचे पाच दरवाजे उघडले

गांव-गांवच्या नद्यांना महापुर, संपर्क देखील तुटला उर्ध्व कुंडलिकाचे पाच दरवाजे उघडले


ग्रामीण भागातील जनतेचा जागता पाहारा
वडवणी तालुक्यात पावसाचा प्रंचड हहाकार
वडवणी (रिपोर्टर):- रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने गांव-गांवच्या नद्यांना महापुर आला असून या गांवचा संपर्क देखील तुटला आहे.तर सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे पाच हि दरवाजे उघडले असून नदी पत्रात पाणी सोडले आहे.तर या नदी काठच्या गांवाशेजारी पाणी आल्याने जनतेनी रात्रभर जागता पाहार दिला असल्याने वडवणी तालुक्यात सर्वत्र पावसाने प्रंचड हहाकार केला आहे.


वडवणी तालुक्यात रात्री ते आज सकाळ पर्यत जोरादार पाऊस झाला आहे.उरले-सुरले राहिलेले शेती पिक देखील या पावसाने वाहून गेले आहे.तर शेतकऱ्यावर हे राम म्हण्याची वेळ आली असून आर्थिक चक्र उमटणार असल्याचे या पावसाने सिध्द केले आहे.असे दिसून आल्यानंतर जगाचा पोशिंदा चिंतातूर झाला असून या मुसळधार प्रंचड पावसाने वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे सर्वच सर्व पाच हि दरवाजे उघडले आहेत.कुंडलिका नदी काठच्या गांवाला पाणी लागले असल्याने लोकांनी रात्र जागून काढली असल्याच बोललं जात आहे .कोठरबन-चिंचवण पुलावरुन पाणी वाहत आहे. तर चिखलबीड, साळींबा, मामला, चिंचोटी,हरिश्चंद्र पिंप्री, चिंचवडगांव, देवडी, पुसरा, तिगांव, देवळा,पिंपरखेड,देवडी यासह आदि गांवगड्याच्या नद्यांना प्रंचड महापुर आल्याने गांवचा संपर्क तुटला असून रात्रीच्या पावसाने तालुक्यात हहाकार केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!