Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडचव्हाणवाडीच्या पाझर तलावाला तडे महसूल, जलसंधारण विभागाची घटनास्थळी धाव

चव्हाणवाडीच्या पाझर तलावाला तडे महसूल, जलसंधारण विभागाची घटनास्थळी धाव


नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन
कुक्कडगाव (रिपोर्टर)- चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असून या पावसामुळे पिकांचे नुकसान तर झालेच मात्र जे जुने तलाव आहेत त्या तलावांच्या भिंतीतून पाणी पाझरत असल्याने आजुबाजुच्या नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चव्हाणवाडी येथील तलावाच्या भिंतीला भेग पडल्यामुळे त्यातून पाणी वाहू लागले आहे. आज सकाळी महसूल आणि जलसंधारण विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. आजुबाजुच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

तीन आठवड्यापूर्वी पडलेल्या पावसाने जिल्हाभरातील सर्वच तलाव पुर्णपणे भरले आहेत. त्यात पुन्हा गेल्या चार दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्या-नाल्यांसह तलाव ओसांडून वाहू लागले आहेत. जुन्या तलावात पाणी जमा झाल्याने काही ठिकाणी तलावाच्या भिंतीतून पाणी पाझरू लागले आहे. बीड तालुक्यातील चव्हाणवाडी तहत हनुमान वस्ती येथील पाझर तलावाच्या भिंतीला तडे गेल्याने या भिंतीतून पाणी पाझरू लागले आहे. घटनेची माहिती गावकर्‍यांनी महसूल विभागाला दिल्यानंतर महसूलचे जाधव, जलसंधारणचे कदम, यांनी घटनास्थळी भेट देऊन तलावाची पाहणी केली तसेच आजुबाजुच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!