अजितदादांच्या फौजेची योगेश क्षीरसागरांना रसद
बीड मतदारसंघातले विविध प्रश्न मंत्र्यांसमोर मांडणार
मंत्र्यांच्या स्वागतासाठी केएसकेत जय्यत तयारी
गेल्या दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काफिल्यात डेरेदाखल झालेले योगेश क्षीरसागर हे कातन झटकून कामाला लागले आहेत. उद्यघा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अर्धे मंत्रिमंडळ बीड ाहरात डेरेदाखल होत आहे. ते सर्व मंत्रिमंडळ योगेश क्षीरसागरांच्या कार्यालयाला भेट देणार आहे. त्यानिमित्ताने राज्याच्या महत्वाचे खाते असलेल्या मंत्र्यांसमोर
बीड विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न योगेश क्षीरसागर मांडणार आहेत. योगेश क्षीरसागर यांनी या सर्व मंत्र्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. प्रवेशा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि अन्य मंत्र्यांनी योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाण्याचे म्हटले होते. प्रवेशानंतर दोनच दिवसात योगेश क्षीरसागरांना राष्ट्रवादीकडून मिळत असलेली रसद ही योगेश क्षीरसागरांसाठी भरीव असणार आहे.