Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईपुलासाठी रोहीतळचे लोक लेंडी नदीत उतरले पडक्या पुलावरून वाहत्या पाण्यात उपोषणाला बसले

पुलासाठी रोहीतळचे लोक लेंडी नदीत उतरले पडक्या पुलावरून वाहत्या पाण्यात उपोषणाला बसले


गेवराई (रिपोर्टर) गेल्या अनेक वर्षापासून जातेगाव ते गेवराई या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता आणि पुल नसल्यानं नदीवर पूल बांधून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून करत पुलावरच आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी आज थेट या लेंडी नदीच्या पुलावरच उपोषण सुरू केले आहे.दरम्यान दुपारी 12 पर्यंत या आंदोलनाकडे प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने उपोषणकर्त्यांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता.
जातेगाव गेवराई रस्त्यावर असलेल्या रोहितळ येथील लेंडी या नदीला पूर आल्यानंतर हा मार्ग पूर्णतः बंद होत असून अनेकांना पाण्यातून वाट काढावी लागते. तर गेल्या वर्षी या नदीत एका मोटारसायकल स्वराचा व दोन लहान मुलांचा देखील पडून अपघात झाला होता. त्यामुळे आता तात्काळ या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी, जातेगाव परिसरातील सहा गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली होती. मात्र यावर प्रशासनाने कुठलाच प्रतिसाद न दिल्याने हे नागरिक चक्क नदीच्या पुलावर उपोषणाला बसले आहेत. सकाळीच मुसळधार झालेल्या पावसाने या लेंडी नदीला पुन्हा पूर आला आऊन या आंदोलन कर्त्यांनी पाण्यात उतरून प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. असून तात्काळ या पुलाचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी करत नागरिकांनी पुलावरच ठिया मांडला आहे.
यावेळी रोहितळचे सरपंच मुकुंद बाबर, प्रा.पी.टी. चव्हाण, सरपंच सतीश चव्हाण, सरपंच काकासाहेब छत्रे, सरपंच सिद्धेश्वर काळे, सरपंच जगन्नाथ काळे, युवा नेते दत्ता वाघमारे, अभयसिंह पांढरे, भरत बादाडे, सुनील मिसाळ, विशाल पांढरे, सचिन चव्हाण, विजयसिंह यमगर, बाळासाहेब लेंडाळ, किशोर चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, नितीन पवार, जगदीश धोंडरे यांच्यासह जातेगाव, सेलू, गोळेगाव, आडगाव, रोहितळ, पांगरी येथील असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी आहेत. लेंडी नदीवरील पुल संपूर्ण वाहून गेला असल्याने जातेगाव परिसरातील सेलू, जातेगाव, गोळेगाव, आडगाव, रोहितळ, केकत पांगरी या ग्रामपंचायतीने ठराव घेत उपोषणास ग्रामस्थांसह ग्रामपंचायतचा पाठिंबा दिला आहे.

Most Popular

error: Content is protected !!