नेकनूर (रिपोर्टर): बेरोजगार, सर्वसामान्य, शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी शासन फक्त दिशाभूल करत आहेत. शासनाने खर्या मुद्याकडे लक्ष द्यावे या मागणीसाठी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नेकनूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. हे आंदोलन सतीश पायाळ यांच्या नेतृत्वात झाले.
राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हाताला काम मिळत नाही. शासन मात्र बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्याऐवजी जनतेची दिशाभूलक ररारे वक्तव्य करत आहे. शेतकरी, मजूर यांचे प्रश्न देखील सोडविले जात नाही. सामाजिक प्रश्नांचे भान राज्य सरकारने ठेवून जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत, या मागणीसाठी आज नेकनूर येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. हे आंदोलन सतीश पायाळ यांच्या नेतृत्वाखाली झाले.