Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनाआनंदाच्या डोही ...... जिल्हा कोरोनामुक्ती कडे चार तालुक्यात 5 कोरोना बाधित ,तरीही...

आनंदाच्या डोही …… जिल्हा कोरोनामुक्ती कडे चार तालुक्यात 5 कोरोना बाधित ,तरीही सावध राहा

बीड (रिपोर्टर)- आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालातून आज समाधानकारक बाब समोर आली असून जिल्हातील 11 पैकी सात तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसून अन्य चार तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत जिल्हातील कोईड सेंटर मध्ये 514 बाधितांवर उपचार सुरु आहे .आजच्या अहवालावरून बीड जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे . असे असले तरी सध्या सणासुदीचा काळ असल्याने नागरिकांनी कोरोनाचे नियम सांभाळून आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सावध राहण्याचा सांगण्यात येत आहे.


दोन वर्ष कोरोना महामारीच्या दहशतीखाली असलेल्या सर्वसामान्यांना गेल्या काही दिवसापासून दिलासा मिळाला आहे. बीड जिल्हात मोठ्या प्रमाणावर बाधित आढाळून येत असल्या मुळे प्रशासनाला अनेक वेळा कठोर पावले उचलावे लागले होते या भयाव परिस्थितून जिल्हा आता सावरत असून आरोग्य विभागाने आज प्रसिद्धीस दिलेल्या माहिती नुसार जिल्हातील 11 तालुक्या पैकी  परळी, आंबाजोगाई, धारूर, वडवणी, गेवराई, पाटोदा, शिरूर या सात तालुक्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही तर गेल्या 24 तासात जिल्हयातून 599 संशयितांची कोरोना चाचणी केली असता 594 जण निगेटिव्ह आले तर चार तालुक्यातील 5 जण कोरोना बाधित आढळून आले. यात आष्टी 1, बीड 1, केज 2, माजलगाव येथील एकाचा समावेश आहे. जिल्हातील कोईड सेंटर मध्ये सध्या 514 बाधित उपचार घेत आहेत. बीड जिल्हा समूळ कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असला तरी सणासुदीच्या काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सावध राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!