Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमशहरात कचर्‍याच्या ढिगार्‍यात आढळले अर्भक

शहरात कचर्‍याच्या ढिगार्‍यात आढळले अर्भक

माजलगाव (रिपोर्टर)-  : शहरातील नवीन शहरातील बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या परिसरात एक मयत अर्भक आज सोमवारी ता 25 सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली असून  घटनास्थळी  शहर पोलिसांनी धाव घेतली असून अर्भक माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.


     येथील बस्थानाकाच्या परिसरामध्ये कचर्‍याच्या ढिगार्‍यावर सोमवारी (ता. 25) सकाळी एक मयत अर्भक आढळून आले. याची माहिती मिळताच  शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून . अर्भक स्त्री जातीचे की पुरुष जातीचे हे समजू शकले नाही. 5 ते 6 महिन्याचे हे अर्भक असल्याची माहिती आहे. अर्भक कुणाचे आहे? कुणी फेकले आदी तपास  शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक.लक्ष्मण केंद्रे,अविनाश , राठोड, पोलिस जमादार तोटेवाड,  ठेंगल, चालक श्रिमंत पवार महिला कर्मचारी मिना काळे या पुढील तपास करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

Most Popular

error: Content is protected !!