बीड (रिपोर्टर): पोलिसांनी वारंवार समज देऊनही गुन्हे करणे सुरुच ठेवणे, समाजात दहशत पसरविणार्या दोन गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. जालिंदर लक्ष्मण जाधव (वय 54 वर्षे), रा. शेलापुरी व विश्वंभर सटवा मेंडके (वय 52 वर्षे), रा. नित्रूड ता. माजलगाव अशी त्यांची नावे आहेत.
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जालिंदर लक्ष्मण जाधव हा पोलिसांनी समज दिल्यानंतरही वारंवार गुन्हे करत होता. हातभट्टी तयार करून तो विक्री करत होता. यासह त्याच्यावर सहा गुन्हे आहेत. या प्रकररी ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख शितलकुमार बल्लाळ यांनी एमपीडीएचा प्रस्ताव एसपींमार्फत
जिल्हाधिकार्यांकडे पाठविला होता. याला मंजुरी मिळताच पोलिसांनी जालिंदर जाधव याच्या मुसक्या बांधत त्याला हर्सूल कारागृहात जेरबंद केले तर िदिंद्रुड पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख सपोनि. खोडेवार यांनी विश्वंभर सटवा मेंडके याच्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला होता. त्यालाही जिल्हाधिकार्यांनी मान्यता देताच दोन्ही आरोपींना हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.सदरील कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शितलकुमार बल्लाळ, खोडेवाड, नन्नवरे, सोनटक्के, सोनटक्के, अभिमन्यू औताडे, विक्की सुरवसे यांनी केली.