Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबीड जिल्हाधिकार्‍यांनी काहीही कारवाई केली नाही किमान केंद्रेकर साहेब तुम्ही तरी कारवाईचा...

बीड जिल्हाधिकार्‍यांनी काहीही कारवाई केली नाही किमान केंद्रेकर साहेब तुम्ही तरी कारवाईचा बडगा उगारा !!,आम आदमी पार्टीचे थेट औरंगाबाद विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन

औरंगाबाद (प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यात इनामी बोगस खालसा जमिनी प्रकरणी एकाच ठिकाणी कारवाई करून प्रशासनाने दुजाभाव केलेला आहे. जिल्ह्यातील सर्वच बोगस खालसा जमिनीप्रकरणी जबाबदार असणार्‍या अधिकारी, लोकप्रतिनिधींची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आम आदमी पार्टी, बीडकडून करण्यात आली होती. मात्र आठवडाभरात जिल्हाधिकार्‍यांनी काहीही कारवाई न केल्यामुळे आम आदमी पार्टीने थेट औरंगाबाद येथील आयुक्तालयासमोर निदर्शने करत केंद्रेकर साहेब, बीड जिल्ह्यातील इनामी बोगस जमिनीप्रकरणी सर्व ठिकाणी कारवाई कधी होणार? असे म्हणत आंदोलन केले आहे.


  श्री प्रकाश आघाव हे उपजिल्हाधिकारी सा. बीड या पदावर रुजू झाल्यापासून बीड जिल्ह्यातील मौजे बीड तरफ पिंगळे येथील शहेनशहावली दर्गाची 145 एकर जमीन, माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील 350 एकर जमीन, गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील शहेनशाहवली दर्गाची 450 एकर जमीन, तळेगाव (परळी तालुका) 56 एकर, बेलखंडी (पाटोदा) येथील गोसावी मठाची 25 एकर जमीन, शेपवाडी(ता अंबेजोगाई) येथील 610 एकर जमीन बोगस खालसा करण्यासह धारूर तालुक्यातील 95 एकर जमीन स्वतः खरेदी करून नातेवाईक व मित्रांच्या नावे करण्यात आल्याचे कळते असून अशाप्रकारे जिल्ह्यातील 10 हजार एकर इनामी जमीनी हडपण्याचा डाव रचला गेला असून त्याबाबत तात्काळ चौकशी समिती नेमून श्री प्रकाश आघाव यांच्यावर कडक कारवाई करावी. एकदोन ठिकाणच्या कारवाई करून सामान्य जनतेला वेड्यात न काढता जिल्ह्यातील सर्वच बोगस खालसा केलेल्या इनामी जमिनींबाबत कारवाईचा दणका देण्यात यावा अशी मागणी आयुक्त केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली.
  यावेळी आम आदमी पार्टीचे मराठवाडा संयोजक तथा माजी सहकार सहआयुक्त डॉ सुभाष माने, मराठवाडा संघटनमंत्री सुग्रीव मुंडे, सय्यद अजहर यांच्यासह बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामधन जमाले, जिल्हा संघटनमंत्री प्रा ज्ञानेश्‍वर राऊत, शहराध्यक्ष सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर आदींसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!