बीड (रिपोर्टर): पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले मात्र अद्यापही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यातील खरीप पिके धोक्यात आहेत. मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पोळा शेतकर्यांसाठी महत्वाचा सण असून यंदाच्या पोळ्यावर दुष्काळासह लंपी आजाराचे सावट असल्याने अगदी साध्या पद्धतीने शेतकर्यांना पोळ्याचा सण आज साजरा करावा लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जनावरांना लंपी आजाराची लागण होऊ लागली. हा आजार संसर्गजन्य असल्याने एका जनावरापासून दुसर्या जनावरांना होतो. आज पोळ्याची मिरवणूक न काढण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. त्यातच यंदा दुष्काळाचे सावट असून समाधानकारक पाऊस पडला नसल्याने खरीप पिके 50 टक्के वायाला गेली आहेत. एकूणच आजची परिस्थिती चिंताजनक असल्याने शेतकर्यांना अगदी साध्या पद्धतीने पोळ्याचा सण साजरा करावा लागत आहे.