बीड (रिपोर्टर)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी बप्पासाहेब घुगे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे कृषिमंत्री तथा धडाडीचे नेते धनंजय मुंडे यांच्या आदेशावरूएन जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांनी घुगे यांची नियुक्ती केली.
अंबाजोगाई येथील कार्यालयात नुकतेच घुगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्यासह राज्यभरातील प्रमख कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. येणार्या काळात बप्पासाहेब घुगे यांनी आपल्या नेतृत्व शैलीतून पक्षाचा विस्तार करावा, अशा सूचना सुनील तटकरे यांनी केल्या. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील घुगे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना घुगे यांनी येणराया काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ध्येय धोरणांना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील नेते व सर्व कार्यकर्ते यांच्यासोबत एकुटीने काम करत पक्षाचे संघटन वाढवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहणार असल्याचे घुगे यांनी सांगितले.