मुंबई (रिपोर्टर)- व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याच वेळी पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (ठऊ) वर वार्षिक व्याज आता 6.5% ऐवजी 6.7% असेल. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरण्यावर तुम्हाला अधिक कर भरावा लागेल.
तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. दिल्लीत आता ते 209 रुपयांनी महागून 1731.50 रुपये झाले आहे. यापूर्वी 1,522 रुपयांना सिलिंडर मिळत होता. कोलकात्यात 1636 रुपयांऐवजी 1839.50 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे, मुंबईत त्याची किंमत 1482 रुपयांवरून 1684 रुपयांवर आणि चेन्नईमध्ये 1898 रुपयांना उपलब्ध आहे.
14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. सध्या दिल्लीत 903 रुपये, भोपाळमध्ये 908 रुपये आणि जयपूरमध्ये 906 रुपयांना उपलब्ध आहे.1 ऑक्टोबरपासून कागदपत्र पडताळणीमध्ये जन्म दाखल्याचे महत्त्व वाढले आहे. नवीन नियमानुसार जन्म प्रमाणपत्राचा वापर शाळा प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, पासपोर्ट आणि आधारसह अनेक ठिकाणी एकच कागदपत्र म्हणून केला जाऊ शकतो.